लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज
लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज बऱ्याच वेळा सकाळी सकाळी आपल्या कानावर जे गाणे ऐकायला येते ते गाणे आपण दिवस भर गुणगुणत असतो किंवा एखादा भुताचा किंवा थ्रिलर चित्रपट आपण पाहतो तेव्हा रात्रभर आपली झोप उडते. अशा कित्तेक सिरिअल्स आहेत ज्या तुम्हाला रडवतात किंवा हसवतात. कधी विचार केलाय अशा स्क्रीन्सचा तुमच्या आयुष्यावर किती मोठा प्रभाव आहे. हो प्रचंड! इतका प्रचंड असतो कि जे आपण बघतो किंवा ऐकतो हळू हळू ते आपले विचार बानू लागतात आणि हे प रीस्तीती आपली तरुणांची किंवा प्रौढांची आहे. विचार करा टीव्ही आणि मोबाइलचा आपल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल? वास्तविकता पाहता मनुष्याच्या मेंदूची अधिक वाढ ही ५ ते ६ वर्ष पर्यंत होते. ह्या वयात मुले जे पाहता किंवा ऐकता त्याच्या परिणाम त्यांच्या संपूर्ण भविष्यवर होतो. छोट्या वयाच्या मुलांकडे प्रचंड मोकळा वेळ असतो आणि पालकांसाठी मुलानं सतत व्यस्त ठेवणे कदापि शक्य नसते. मुलांना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी पालकांना खूप त्रास उचलावा लागतो. ...