लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज

लहान मुलांच्या टीव्ही मोबाईलच्या वापरावर नियंत्रणाची गरज
बऱ्याच वेळा सकाळी सकाळी आपल्या कानावर जे गाणे ऐकायला येते ते गाणे आपण दिवस भर गुणगुणत असतो किंवा एखादा भुताचा किंवा थ्रिलर चित्रपट आपण पाहतो तेव्हा रात्रभर आपली झोप उडते. अशा कित्तेक सिरिअल्स आहेत ज्या तुम्हाला रडवतात किंवा हसवतात. कधी विचार केलाय अशा स्क्रीन्सचा तुमच्या आयुष्यावर किती मोठा प्रभाव आहे. हो प्रचंड! इतका प्रचंड असतो कि जे आपण बघतो किंवा ऐकतो हळू हळू ते आपले विचार बानू लागतात आणि हे परीस्तीती आपली तरुणांची किंवा प्रौढांची आहे. विचार करा टीव्ही आणि मोबाइलचा आपल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल? 
                 वास्तविकता पाहता मनुष्याच्या मेंदूची अधिक वाढ ही ५ ते ६ वर्ष पर्यंत होते. ह्या वयात मुले जे पाहता किंवा ऐकता त्याच्या परिणाम त्यांच्या संपूर्ण भविष्यवर होतो.  छोट्या वयाच्या मुलांकडे प्रचंड मोकळा वेळ असतो आणि पालकांसाठी मुलानं सतत व्यस्त ठेवणे कदापि शक्य नसते. मुलांना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी पालकांना खूप त्रास उचलावा लागतो. सध्याच्या युगात ज्या काही निवडी दर्शकांना उपलध आहेत त्या इतक्या जबरदस्त आहेत की पालकांचे थोडे दुर्लक्ष्य देखील खूप सहजपणे मुलांच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. काही संशोधनातून दिसून आले आहे की मोबाईल किंवा टीव्हीमुळे मुलांमद्ये   लठ्ठपणा, स्थूलपणा, हिंसक किंवा अनपेक्षित वर्तन दिसून येते. पण जर पालकांनी काळजी पूर्वक लक्ष्य देऊन मोबाईल किंवा टीव्हीचा उपयोग केला तर हे माध्यम नक्कीच तुमच्या मुलांना जागतिक पातळीवरीन ज्ञान मिळवण्यास मदत करते.              
कला व हस्तकला : पालकांनी अती टीव्ही किंवा अजिबात नाही यात एक सुवर्णमध्य काढला पाहिजे. आपल्या मुलांना अशा उपकरणांना मर्यादा घालण्याचे बरेच मार्ग आहेत. घरातल्या एका विशिष्ट जागेवर आर्ट आणि क्राफ्टची साधने उपलब्ध करून देऊ शकतात जेथे त्यांना पूर्णपणे त्यांच्या विचारांनी चित्र काढू देणे,  गोष्टी लिहिणे किंवा हस्तकलेच्या वस्तू तयार करणे याचे स्वातंत्र्य असावे. पालकांना शक्य असेल तेव्हा मुलांबरोबर बसून त्यांना कलाकृती बनवण्यास मदत करावी. आपल्या परिवारातील जास्तीत जास्त मेंबर्सला सहभागी करण्याचा प्रयत्न्य करावा ज्यामुळे मुलांमद्ये आवड निर्माण होते. अशाप्रकारे मुले कलेला शिक्षण म्हणून ना घेता खेळ म्हणून शिकतात आणि हा नक्कीच मोबाईल किंवा टीव्हीसाठी उत्तम पर्याय आहे.
 मैदानी खेळ किंवा व्यायाम: आपल्या सर्वांनाच माहित आहे कि व्यायाम आपल्या शरीर व आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे. पालकांनीच उत्साहाने बाहेर निघून मुलांबरोबर चक्कर मारली पाहिजे. आजकाल जागो जागी जॉगर्स पार्क आहेत जेथे आपण मुलांना घेऊन जाऊ शकतात. उद्याणानमधील खेळणी हे एकप्रकारचे व्यायामाचे साहित्याचं असतात ज्याचा मुलांच्या वाढीसाठी योग्य उपयोग होतो. आपल्या मुलांना शालेय खेळांमद्ये सहभागासाठी प्रवृत्त करावे किंवा लहानमुलांच्या सामाजिक संस्थानमद्ये न्यावे ज्याद्वारे सामाजिक कार्यकारण्यांची आवड निर्माण होते. अशा प्रकारे ऍक्टिव्ह राहणे सुद्धा मुलांचे मोबाईल किंवा टीव्ही कडील लक्ष्य कमी करते.
 कौटुंबिक वेळ: कुटुंब आणि भावंडांन बरोबर घालवलेला वेळ हा प्रचंड मोलाचा व आनंददायी असतो. हि गोष्ट मुलांच्या देखील फार लवकर लक्षात येते कि भावंडांबरोबर खेळण्यातली मजा हे या उपकरणांमद्ये नाही. मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर ठेवण्याचा अजून एक उत्तम उपाय म्हणजे रोज रात्री कौटुंबिक वेळ ठरवून घरातले सर्व एकत्र बसून गप्पा मारतील किंवा घरगुती खेळ खेळतील. खेळ निवडतांना प्रत्येकाचे मत घ्यावे व काळजी घ्यावी कि खेळ मुलांच्या आवडीचं व योग्यतेचे असतील.

 टीव्ही मोबाइलची निश्चित वेळ : खरंतर हे खूप शहाणपणाचे असू शकते जर आई वडिलांनी एकत्र बसावे व ठरवावे कि कुटुंब साठी टीव्हीचा वेळ किती असावा.  तुम्ही ठरवलेली वेळ हि सर्व उपकरणंसाठी असावी, जसे मोबाइल, टीव्ही, टॅब्लेट्स व कॉम्प्युटर्स. आणि या पेक्षाही महत्वाचे कि आपण आपला स्वतःचा वेळ निश्चित करावा जेणेकरून आपण मुलांसाठी एक उत्तम उद्धरण ठरू शकतो. तुमचे दिवसभर टीव्ही पाहणे आणि मुलांची अडवणूक करणे हि एक प्रकारची मुलांची फसवणूकच ठरते. आजकाल प्रत्येकाच्या खोलीत टीव्ही असावा हि फॅशन झाली आहे सर्वप्रथम आपल्या खोलीतील टीव्ही काढून टाकावा व सर्वांसाठी एकच टीव्ही घरात हॉल मद्ये ठेवावा ज्यामुळे सर्व ठरलेल्या वेळात एकत्र येतात. आपले टीव्ही पाहण्या मागचे उद्दिष्ट निश्चित असावे व जे कार्यक्रम आवडतात तेव्हडेच पाहावे व पावोर ऑफचे बटण दाबावे.

  पोर्नोग्राफी: हा पालकांसाठी एक धड्की भरणारा विषय आहे. कोणत्या क्षणी कोणती जाहिरात येईल ह्याचा नेम नाही. ह्या विषयासाठी मुले खूप लहान आहेत कारण त्यांना जे दिसते ते नैसर्गिक नसते बनावटी असत. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अशा जाहिरातींना फिल्टर करावे किंवा रिपोर्ट अबुझ करावे. अशा विषयावर रागावणे हा पर्याय नसून  मुलांना समजावणे गर्जेचे आहे कि सगळं चुकीचा आणि खोटा आहे.

 पालकांची जबाबदारी: पाच वर्षांवरील मुलांमद्ये निर्णय घेण्याची क्षमता यायला लागते आणि त्यामुळे मुले सक्षम बनतात. म्हणून मुलांना निवडीची संधी द्या जबाबदारी टाका. कधी कधी मुले आपल्याला उत्तर देतात "मी तुम्हाला कधी कोणत्या गोष्टी साठी अडवत नाही तुम्ही का मला कायम वेळेचे बंधन घालतात?" हे घडत जेव्हा तिथे सक्षमतेची लढाई असते.  जेव्हा मुले विरोध करतात तेव्हा त्यांच्या विरोधाचे कारण समजले पाहिजे. गरज असेल तेव्हा असे मार्ग शोधा ज्यातून मुलांना योग्या निर्णय घेण्याची संधी मिळेल. हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे कि "खूपवेळा मुलांना चुकीच्या पद्धतीने समजावले जाते, त्यांना तुमच्या समजावण्याचा  किंवा अडवण्याचा राग नसतो, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना दुरुस्त करतात ती पद्धत चुकीची असते. तुमच्या आवाज आणि तुमच्या बोलण्याची पद्धत, कोणत्या शब्दात तुम्ही मुलांना समजावता हे खूप महत्वाचे असते."

आपण आपल्या मुलांबरोबर तंत्रज्ञानावर आणि त्यांच्या वापराबद्दल मार्गदर्शन करावे. मुलांबरोबर बसून वापराचे काही नियम बनवावे. मुलांना समजवावे कि त्यांनी नियम तोडल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील. त्यांना भोगावी लागणारी शिक्षा पण त्यांनाच ठरवू द्यावी. त्यांना नियम तोडू द्या आणि त्याचे परिणाम पण भोगू द्या. त्यांना लवकरच समजेल कि या कारणांवर वाद घालणे उपयोगाचे नाही.

सर्व गोष्टी नियंत्रित असणे हा एक नियम आहे आणि हा नियम सर्वांसाठीच आहे मग तो टीव्ही असावा किंवा तुमचे मुलं. मुलांचा टीव्ही पूर्णपणे बंद करणे हे शक्य नाही किंवा तसे सुचवणे पण योग्य नाही. पण तुम्ही नक्कीच त्यावर नियंत्रण ठेऊ शकतात. मुलांना टीव्ही पासून दूर ठेवणे हे नक्कीच मुलांच्या वाढीसाठी नक्कीच उपयुक ठरेल. म्हणून तुम्ही काही नियम ठरवून मुलना टीव्ही, कॉम्पुटर किंवा मोबाइलचा योग्य उपयोग करता येईल ह्याची काळजी घ्यावी.

शशांक श्रीराम जोशी
स्पोर्ट्स कोच
नाशिक स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमी.
shashankj1081@gmail.com
9049918284


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

KEEP YOUR CHILD AWAY FROM TV, MOBILE

Are we seeing more children with motor skill difficulties?

Sports is equally important as Academics.